मुंबई,दि. २३ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
निर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात 'ग्राहकांचे
हित व संरक्षण' या
विषयावर अन्न व नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक
व राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे न्यायिक सदस्य दिलीप शिरासाव यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार
आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. २४ डिसेंबर २०१९ रोजी संध्याकाळी
७.३० वाजता प्रक्षेपित होणार आहे. निवेदक
राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
दिनांक २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनाचे
महत्व, ग्राहक संरक्षणाकरिता कार्यरत यंत्रणा,कंझ्युमर क्लबचे
कार्य,वैधमापनशास्त्र यंत्रणेमध्ये अधिकाधिक ग्राहकांचा
सहभाग असावा यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, राज्य
ग्राहक कल्याण निधीचे कामकाज,ग्राहक कायदा, ग्राहकांना तत्काळ न्याय मिळावा यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न,राज्यातील ग्राहक न्यायालयांचे कामकाज या विषयांची सविस्तर
माहिती श्री. पाठक व श्री.
दिलीप शिरसाव यांनी 'जय महाराष्ट्र'
कार्यक्रमात दिली आहे.
0000
No comments:
Post a Comment