नागपूर, दि.23 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन शुक्रवार, दिनांक 27 डिसेंबर 2019 रोजी सेंट उर्सुला गर्ल्स हायस्कुल, नागपूर येथे आयोजित करण्यात येणार आहे.
या महोत्सवाअंतर्गत लोकगीत, लोकनृत्य, एकांकिका (हिंदी किंवा इंग्रजी), शास्त्रीय वाद्य वादन (सितार, बासरी, तबला, विणा, मृदुंग, हार्मोनियम {लाईट}), गिटार, शास्त्रीय गायन, भरतनाट्यम, कथ्थक, मनीपूरी, ओडीसी, कुचीपुडी, स्वयंस्फुर्त, वक्तृत्व (हिंदी किंवा इंग्रजी) कला बाबींच्या सहभाग राहणार आहे. युवा महोत्सव स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकाचे वय 15 ते 29 या वयोगटात असावे. स्पर्धकाचा जन्म दिनांक 12 जानेवारी 2005 पूर्वीचा व दिनांक 12 जानेवारी 1991 नंतरचा असावा. तसेच गट तीन (सन 2015-16, 2016-17, 2017-18) वर्षातील राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी झालेल्या युवक युवतींना सहभाग घेता येणार नाही, याची नोंद घ्यावी अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी पत्रका द्वारे दिली आहे.
जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये विजयी स्पर्धकांना (प्रथम, द्वितीय, तृतीय) सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल. जिल्हास्तरीय युवा महोत्सवात जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालय तसेच सांस्कृतिक मंडळे यांनी आपला प्रवेश अर्ज दिनांक 26 डिसेंबर 2019 पूर्वी सादर करावा. सोबत जन्मतारखेचा दाखला व आधारकार्ड, पासपोर्ट फोटो व नागपूर जिल्ह्याचा रहिवासी दाखला अनिवार्य असून कार्यालयीन कामाच्या दिवशी व वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल, कोराडी रोड, मानकापूर, नागपूर येथे सादर करावे. अधिक माहितीकरिता क्रीडा अधिकारी श्रीमती माया दुबळे यांच्याशी दूरध्वनी क्रमांक 8857944259 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
*******
No comments:
Post a Comment