Saturday, 21 December 2019

विना अनुदानित शाळांना अनुदानासंदर्भात प्रचलित धोरण राबविण्यासंदर्भात शासन सकारात्मक - बाळासाहेब थोरात

नागपूरदि. 21 : राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यासाठी पूर्वीच्या प्रचलित अनुदान धोरण अंमलात आणण्याबाबत राज्यशासन विचार करत असून लवकरच याबाबत मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज येथे दिली.
विधानपरिषदेत सदस्य श्री. विक्रम काळे यांनी कायम विना अनुदानित शाळांच्या अनुदानासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सुचनेवर ते बोलत होते.
श्री. थोरात म्हणाले कीविनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याची प्रचलित पद्धत होती. मात्रती बंद करण्यात आली आहे. या शाळांना शंभर टक्के अनुदान देण्यासाठी पूर्वीप्रमाणेच प्रचलित अनुदान धोरण अंमलात आणण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच अनुदान देण्याच्या अटीसंदर्भातही योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
या चर्चेत सदस्य सर्वश्री नागो गाणारडॉ. रणजित पाटीलप्रा. अनिल सोलेश्रीकांत देशपांडे यांनी सहभाग घेतला.
०००००

No comments:

Post a Comment