नागपूर, दि. 21 : शासकीय नोकऱ्यांमध्ये विदर्भ व कोकणातील तरुणांचा जास्तीत जास्त समावेश व्हावा, यासाठी त्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यासंदर्भात राज्यशासन सकारात्मक असून विदर्भ व कोकणात रोजगार संधी वाढविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येणार असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.
विधानपरिषदेत सदस्य ख्वाजा बेग यांनी मांडलेल्या लक्षवेधी सुचनेवर श्री. देसाई बोलत होते.
श्री. देसाई म्हणाले की, नागपूर कराराप्रमाणे शासकीय नोकऱ्यांमध्ये विदर्भातील तरुणाचे प्रमाण पुरेसे आहे. याचप्रमाणे कोकणातील तरुणांचेही लोकसंख्येच्या प्रमाणात शासकीय नोकऱ्यांमध्ये प्रमाण कमी आहे. या दोन्ही विभागातील तरुणांचे नोकऱ्यांमधील प्रमाण आणखी वाढावे, यासाठी येथील तरुणांना स्पर्धा परिक्षांचे प्रशिक्षण देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.
या चर्चेत सदस्य श्री. बेग, डॉ. रणजित पाटील, श्री. जोगेंद्र कवाडे आदींनी भाग घेतला.
००००
No comments:
Post a Comment