नागपूर, दि. 24 : नागपूर कोषागारांतर्गत निवृत्तवेतन घेत असलेल्या निवृत्तीवेतनधारकांनी नोव्हेंबर महिन्यात सादर करावयाचे हयातीचे दाखले ऑनलाईन अथवा बँकेमार्फत सादर केले नसल्यास त्यांनी तातडीने हयातीचा दाखला ऑनलाईन अथवा बँकेमार्फत सादर करावा. अन्यथा त्यांचे डिसेंबर 2019 चे निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतन बँकेत जमा केल्या जाणार नाही, याची संबंधित निवृत्तीवेतनधारकांनी नोंद घ्यावी, असे वरिष्ठ कोषागार अधिकारी प्रकाश आकरे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
हयातीचा दाखला सादर केलेल्या निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचेच माहे डिसेंबर 2019 चे निवृत्तीवेतन संबंधितांच्या बँकेत जमा करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे.
****
No comments:
Post a Comment