नागपूर दि. 24: दहावीच्या परीक्षेसाठी नियमित, पुनर्परीक्षार्थी व खाजगी विद्यार्थ्यांनी नियमित व विलंब शुल्कासह अर्ज स्वीकारण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे विलंब शुल्कानंतरच्या अतिविलंब व अतिविशेष अतिविलंब शुल्कासह अर्ज स्वीकारण्याच्या तारखा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केल्या आहेत.
अतिविलंब शुल्क दि. 13 जानेवारी 2020 पर्यंत प्रतिदिन 50 रुपये याप्रमाणे आकारले जाईल. विशेष अतिविलंब शुल्क दि. 14 ते 28 जानेवारी 2020 या कालावधीत प्रतिदिन 100 रुपये याप्रमाणे आकारले जाईल. अतिविशेष अतिविलंब शुल्क दि. 29 जानेवारी ते 12 फेब्रुवारी 2020 दरम्यान प्रतिदिन 200 रुपये याप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी महाविद्यालयांनी ही प्रक्रिया विद्यार्थ्यांकडून वेळेत करून घ्यावी, असे आवाहन मंडळाचे विभागीय सचिव रविकांत देशपांडे यांनी केले आहे.
दहावीच्या फेब्रुवारी-मार्च 202 0 मधील नियमित विद्यार्थी किंवा पुनर्परीक्षार्थी, तुरळक विषयाचे परीक्षार्थी, श्रेणीसुधार योजनेतील, तसेच खाजगी विद्यार्थ्यांचे विलंबाच्या कालावधीनुसार शुल्क स्वीकारण्यात येणार आहे.
या संकेतस्थळावर सदर शुल्कासह आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने भरावी. त्यानंतर विद्यार्थी व प्राचार्य, मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरीसह आवेदनपत्राची मूळ प्रत शुल्कासह विभागीय मंडळाकडे सादर करावी, असे निर्देश शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव रविकांत देशपांडे यांनी दिले आहेत.
No comments:
Post a Comment