नागपूर दि. 24: केंद्र शासनाच्या व नाफेडच्या वतीने आधारभूत किंमत धान्य खरेदी योजना 2019-20 करीता मार्केटिंग फेडरेशन तर्फे नागपूर जिल्ह्यातील रामटेक, महादुला (मौदा), भिवापूर आणि उमरेड या चार ठिकाणी किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत कडधान्य व तेलबिया खरेदी केंद्र सुरु करण्यात असल्याचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी सांगितले.
एफ. ए. क्यू. ज्वारी व मका खरेदीसाठी कळमेश्वर, हिंगणा, सावनेर, काटोल, नरखेड, नागपूर, बुटीबोरी या ठिकाणी खरेदी केंद्र सुरु करण्यात आले आहेत. सदर केंद्र स्थानिक तालुका सह. खरेदी विक्री संघामार्फत संचालित करण्यात येत आहे.
तसेच एफ.ए.क्यु. सोयाबीनसाठी चार केंद्र भिवापूर, काटोल, उमरेड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरु करण्यात आले आहेत. तरी सर्व शेतकऱ्यांनी वरील ठिकाणी तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री संस्थेच्या कार्यालयात व कृषी उत्पन्न बाजार समितीत अधिक माहितीकरिता संपर्क साधावा.
शेतकऱ्यांनी धान्य हमी भावापेक्षा कमी भावाने कुठल्याही परिस्थितीत कडधान्य व तेलबिया विकू नयेत तसेच शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment