राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्नित
अशासकीय अनुदानित महाविद्यालयांतील ज्या अधिव्याख्यात्यांनी 1 जानेवारी 1996 पूर्वी पीएच.डी
पूर्ण केली आहे,
त्यांना 27 जुलै 1998 ऐवजी 1 जानेवारी
1996 पासून दोन आगाऊ वेतनवाढी देण्यासाठी घेतलेल्या निर्णयाच्या इतिवृत्तास
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
राज्यातील पीएच.डी. अर्हताप्राप्त अधिव्याख्यात्यांना
दोन वेतनवाढी मंजुर करण्यात आल्या होत्या. मात्र या वेतनवाढी 1996 पासून करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुसार हा प्रस्ताव
मंजूर करण्यात आला. यासाठीच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
-----0-----
No comments:
Post a Comment