नागपूर,
दि. 30: देशाच्या स्वातंत्र्यासाठी
प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना आज हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन केले. त्यानिमित्त
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या व्हरायटी चौकातील पुतळ्यास राज्याचे गृहमंत्री
अनिल देशमुख यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी माजी मंत्री रमेश बंग,
नगर सेवक दुनेश्वर आदी पेठे उपस्थित होते.
विभागीय आयुक्त कार्यालयात
अभिवादन
हुतात्मा दिनानिमित्त विभागीय आयुक्त
डॉ. संजीव कुमार यांनी हुतात्म्यांना अभिवादन करुन आदरांजली वाहिली. कार्यालयाच्या
सभागृहात हुतात्मा दिनानिमित्त दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. यावेळी उपायुक्त संजय धिवरे, के. एन. के. राव,
अंकुश केदार, शैलेंद्र मेश्राम, प्रताप वाघमारे यांचेसह अधिकारी व कर्मचारी
उपस्थित होते.
********
No comments:
Post a Comment