नागपूर, दि. 31 : नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला असून, त्यानुषंगाने नावनोंदणीतील विहित कार्यपद्धतीनुसार निकाली काढण्यास पात्र असलेले दावे, नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत निकाली काढून पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत, त्यासाठी पदवीधारकांनी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणी करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.
मतदार नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा https://ceo.maharashtra.gov. in/GOnline/Graduate19.aspx या लिंकवर उपलब्ध करण्यात आली असून सर्व पात्र पदवीधरांनी आपले दावे व हरकती दाखल करावेत. या कार्यक्रमांतर्गत 30 डिसेंबर 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी झाल्यानंतरही निरंतर मतदार नोंदणी सुरु राहणार आहे.
अधिक माहितीसाठी विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर किंवा जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर तसेच गडचिरोली यांचेशी संपर्क साधावा, असे विभागीय आयुक्तांनी कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment