नागपूर, दि. 1 : मानवीय पद्धतीने घेण्यात येणारा व्यवसाय कर आता ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय कर भरण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने प्रणाली विकसित केली आहे. सद्य:स्थितीमध्ये व्यवसाय कर ऑनलाईन पद्धतीने भरण्याकरीता परवानाधारकांनी विक्रीकर विभाग यांच्या www.mahagst.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. या संकेतस्थळावर जाऊन ई-पेमेंट हा पर्याय निवडावा, त्यानंतर ई पेमेंट रिटर्न्स निवडावे आणि पॅन कार्डची नोंद करावी.
परवानाधारकाने पॅन कार्डची नोंद घेतल्यानंतर संपूर्ण तपशील भरावा व ग्रास अथवा ई - पेमेंटच्या पर्यायाचा वापर करुन ऑनलाईन पद्धतीने ई - पेमेंट करावे. ई - पेमेंटचा वापर करतांना स्टेट बँक ऑफ इंडिया ई-पेचा वापर करता येतो.
परवानाधारकांनी ऑनलाईन पद्धतीचा वापर करुन व्यवसाय कर भरुन चालनाची प्रत प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणीकरीता जमा करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी दिनकर मनवर यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment