नागपूर दि. 1 : प्रादेशिक मनोरुग्णालयातील मनोरुग्ण संतोष आमधरे यांचा मृत्यू दिनांक 12 जुलै 2016 रोजी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय येथे झाला. त्यांच्या मृत्युच्या घटनेची दंडाधिकारीय चौकशी उपविभागीय दंडाधिकारी यांचे मार्फत करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी यांनी दिलेले आहेत.
संतोष आमधरे मनोरुग्णाच्या मृत्युबाबत त्या घटनेची कारणे व परिस्थिती व मृतकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेली इतर संयुक्तिक कारणे जसे शासन यंत्रणेकडून झालेली दिरंगाई अथवा दाखल करण्यात आलेले खोटे अहवाल ह्या बाबींवर उपविभागीय दंडाधिकारी (ग्रामीण) दंडाधिकारीय चौकशी केली जाईल.
या घटनेची प्रत्यक्ष माहिती असणाऱ्या आणि चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिुकांनी माहिती आणि सत्य परिस्थितीबाबत आपले लेखी निवेदन शपथपत्रासह तहसील कार्यालय, नागपूर (ग्रामीण) इमारत, पहिला माळा, आमदार निवासाजवळ, सिव्हिल लाईन्स येथे तात्काळ सादर करावे, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी श्रीमती इंदिरा चौधरी यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment