मुंबई, दि. 28 : भंडारा जिल्ह्यातील रस्ते, पुलांची कामे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना
व प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, दलित वस्ती
सुधारणा योजना आदी योजनेतील सन 2019-20 च्या कामांना निधी देण्याचे तसेच पुढील आर्थिक
वर्षाच्या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना
पटोले यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
भंडारा जिल्ह्यातील साकोली व लाखांदुर
तालुक्यातील विविध विकास कामांना निधी वितरित करण्यासंदर्भात श्री. पटोले यांनी आज
विधीमंडळात ग्राम विकास विभाग, सार्वजनिक
बांधकाम विभाग, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, नगर विकास, अल्पसंख्यांक विभाग आदी विविध विभागांच्या सचिवांबरोबर बैठक
घेतली. त्यावेळी त्यांनी सूचना केल्या.
ग्राम सडक योजनेअंतर्गत लाखांदूर व साकोली
जिल्ह्यातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी निधी वितरित करण्यात यावे. तसेच
तालुक्यातील तीन पुलांची कामे लवकरात लवकर सुरू करण्यासंबंधी कार्यवाही करावे. साकोलीतील
शासकीय विश्रामगृहाचे नुतनीकरणाचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. नगर
परिषदांच्या रिक्त पदे भरण्यात यावीत. तसेच नव्या इमारतीसाठी निधीची उपलब्धता करण्याचे
निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
सामाजिक न्याय विभागाच्या दलित वस्ती
सुधारणा योजनेअंतर्गत बुद्ध विहाराचे काम मंजूर करावेत. तसेच त्यामध्येच इ ग्रंथालयाच्या
कामास मंजुरी देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी ग्राम
विकास विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, सामाजिक न्याय विभागाचे सचिव पराग जैन नानोटिया, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सी. पी. जोशी यांच्यासह विविध अधिकारी
उपस्थित होते.
००००
No comments:
Post a Comment