Tuesday, 28 January 2020

उल्हासनगर, अंबरनाथ रुग्णालयातील रिक्त पदे भरून सेवेचा दर्जा सुधारा - राजेंद्र पाटील यड्रावकर

मुंबई, दि. २८ : मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर आणि कै. बी.जी. छाया उपजिल्हा रुग्णालय अंबरनाथ येथील रुग्णालयातील रिक्तपदे भरण्यात यावीत. तसेच या रुग्णालयातील सोईसुविधांचा दर्जा सुधारावा असे निर्देश सार्वजनिक  आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी  दिले.
मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर-3 आणि कै. बी.जी. छाया उपजिल्हा रुग्णालय अंबरनाथ येथील सोईसुविधांचा आढावा बैठक सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आमदार डॅा. बालाजी किणीकर, अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, आरोग्य सेवा संचालनालयाचे आयुक्त डॅा. अनुपकुमार यादव, संचालक डॅा. साधना तायडे, सहसचिव मनोहर ठोंबरे यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर  आणि कै. बीजी. छाया उपजिल्हा रुग्णालया अंबरनाथ येथे रिक्त पदे मोठ्या प्रमाणावर आहेत. या रुग्णालयातील रिक्तपदे प्राधान्याने भरण्यात यावीत. तसेच तसेच शस्त्रक्रियागृह, शवविच्छेदनगृह, निवासस्थान, रुग्णवाहिका यांचा दर्जा सुधारावा. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक कुठलाही अडचण येणार नाही याविषयी सर्वतोपरी खबरदारी घ्यावी, असे निर्देश श्री. यड्रावकर यांनी यावेळी दिले.  
००००

No comments:

Post a Comment