Thursday, 13 February 2020

जी.डी.सी. ॲण्ड ए. व. सी. एच. एम परीक्षा 22, 23 व 24 मे रोजी


                                                   
                                
नागपूर, दि. 13 : सहकार खात्यामार्फत घेण्यात येणारी जी. डी. सी. ॲण्ड ए. व. सी.एच.एम परीक्षा 22, 23 व 24 मे रोजी घेण्यात येणार असून परीक्षार्थीकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज 15 फेब्रुवारी ते 16 मार्च 2020 पर्यंत भरता येतील. परीक्षार्थींसाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या सविस्तर सूचना सहकार विभागाच्या gdca.maharashtra.gov.in  तसेच sahakarayukta.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज भरताना तयार केलेला स्वत:चा  युजर आयडी व पासवर्ड परीक्षार्थींनी परीक्षेचा निकाल प्रसिद्ध होईपर्यंत जतन करुन ठेवावा, अशाही सूचना जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नागपूर यांनी दिल्या आहेत.
*****

No comments:

Post a Comment