नागपूर, दि. 3 : अनुसूचित जाती-विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास या सर्व प्रवर्गातील 2019-20 या शैक्षणिक वर्षात इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेत शिकणारे विद्यार्थी तसेच शासकीय सेवा, निवडणुकीत उमेदवारी व इतर कारणास्तव जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी आपल्या अर्जातील त्रुटींचे निराकरण 25 फेब्रुवारीपर्यंत करण्याचे आवाहन जिल्हा जात पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी ए. आर. रामटेके यांनी केले आहे.
संबंधित अर्जदारांना जिल्हा जात पडताळणी समितीकडून प्रस्तावातील विविध त्रुटींचे निराकरण करण्याचे वारंवार आवाहन करण्यात आले आहे. मात्र, अद्यापही संबंधित अर्जदारांनी त्याबाबत कार्यवाही केली नसल्यास 25 फेब्रुवारीपर्यंत ती करावी. ही त्रुटीपूर्तता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दुसरा माळा, विंग बी, शासकीय आय. टी. आय. समोर, दीक्षाभूमी रोड, नागपूर -440022 येथे संपर्क साधावा, असे संशोधन अधिकारी यांनी कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment