Monday, 3 February 2020

आयुक्त कार्यालयातील उपायुक्त संजय धिवरे, धर्मेश फुसाटे यांना निरोप

             नागपूरदि. 3 :   विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त संजय धिवरे  व तहसिलदार धर्मेश फुसाटे सेवानिवृत्त झाले असून विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून त्यांना निरोप देण्यात आला.
            निरोप समारंभात पुनर्वसन उपायुक्त मिलिंद साळवे, विकास उपायुक्त अंकुश केदार, के. एन. के. राव, सहाय्यक संचालक श्रीमती कुमुदिनी हाडोळे, तहसिलदार प्रताप वाघमारे, अरविंद सेलोकर आदी उपस्थित होते.
            उपायुक्त संजय धिवरे हे 33 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले असून गडचिरोली, चंद्रपूर तसेच उत्तर महाराष्ट्रात विविध पदांवर कार्यरत होते. धर्मेश फुसाटे पुरवठा विभागात तहसिलदार या पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. ते रामटेक,  नागपूर तसेच चंद्रपूर जिल्ह्यात विविध पदावर कार्यरत होते.
            शासकीय सेवेत जनतेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ सुलभपणे देण्यासोबतच प्रत्येक काम प्रामाणिकपणे केल्यास शासकीय सेवेत यशस्वी अधिकारी म्हणून ओळख निर्माण होते. सेवेत असताना व सेवा निवृत्तीनंतर केलेल्या कामाबद्दल आपण समाधानी असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.
            उपायुक्त संजय धिवरे तहसिलदार धर्मेश फुसाटे यांनी मनोगत व्यक्त केले. पुनर्वसन उपायुक्त मिलिंद साळवे, अंकुश  केदार, रजनी माने, प्रताप वाघमारे, सोनाली वाघ आदींनी  यावेळी मनोगत व्यक्त केले.
            श्री. पारधी यांनी सूत्रसंचालन तर जॉन ॲन्थनी मॅथ्यू यांनी आभार मानले.
*****  

No comments:

Post a Comment