Saturday, 1 February 2020

दहावी माध्यमिक शालांत परीक्षेची प्रवेशपत्रे उपलब्ध


            नागपूर, दि.1 :  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक  शालांत प्रमाणपत्र दहावीच्या परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे मंडळाच्या संकेतस्थळावर आजपासून उपलब्ध करुन देण्यात आली असून, दहावीच्या विद्यार्थ्यांनी ती डाऊनलोड करुन घेण्याचे आवाहन मंडळाचे विभागीय सचिव रविकांत देशपांडे यांनी केले आहे.
           नागपूर विभागातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी, पालकांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2020 साठी प्रवेशपत्रे शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर  आज शनिवार (दिनांक 1 )पासून ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. ती मिळविण्यासाठी www.mahasscboard.in वर स्कूल लॉनइन मधून डाऊनलोड करुन घ्यावीत. प्रवेशपत्रे डाऊनलोड करताना तांत्रिक अडचणी उद् भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधण्याचे आवाहन श्री. देशपांडे यांनी केले आहे.   
*****

No comments:

Post a Comment