Thursday, 13 February 2020

राज्यमंत्री भरणे यांच्याकडून गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाची पाहणी






नागपूर, दि. 13:  गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात सुरु असलेल्या विकास कामांची वने राज्यमंत्री दत्तात्राय भरणे यांनी आज पाहणी केली.  
येथील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयाच्या निमित्ताने भारतातील सर्वात मोठे संलग्न सफारी प्राणीसंग्रहालय विकसित होत आहे. राज्यमंत्री भरणे यांनी येथील विकास कामांची भेट देवून माहिती घेतली. महाराष्ट्र वनविभाग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एन. रामबाबू, बी. एल. गौतम, मुख्य महाव्यवस्थापक श्रीमती इम्तिएनला आव, व्यवस्थापक ऋिषिकेश रंजन, गोरेवाडा प्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक नंदकिशोर काळे यावेळी उपस्थित होते.
गोरेवाडा प्राणीसंग्रहालयातील सफारीची सुविधा सुमारे 564 हेक्टर क्षेत्रात होणार आहे. यात इंडियन सफारी, आफ्रिकन सफारी, बायोपार्क, नाईट सफारी आणि बर्ड पार्क विकसित करण्यात येत आहे. यावेळी श्री. भरणे यांनी लेपर्ड सफारी, टायगर सफारी, स्लॉद बिअर सफारी व इतर बांधकामांची पाहणी केली. गोरेवाडा प्राणीसंग्रहालयाचे काम प्रगतीपथावर असल्याबाबत समाधान व्यक्त करून श्री. भरणे यांनी प्राणीसंग्रहालयाचे बांधकाम उच्च दर्जाचे तसेच वन्य प्राण्यांच्या सोयीसुविधांना प्राधान्य देवून करण्यात यावे, अशा सूचना संबंधितांना केल्या.

*******

No comments:

Post a Comment