नागपूर, दि. 6 : ग्राम विकास मंत्री हसन
मुश्रीफ हे उद्या, शनिवार (दि. 8) रोजी नागपूर येथे येणार आहेत. नागपूर
विमानतळावरुन सकाळी 11 वाजेच्या सुमारास काटोलकडे प्रयाण करतील. येथील स्थानिक
कार्यक्रमांना उपस्थित राहून सकाळी साडेअकरा वाजता खापरी केनेकडे प्रयाण करतील.
नरखेड तालुक्यातील खापरी केने, भारसिंगी, करंजोली, घोगरा, लोहारी सावंगा येथील
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमास ते
उपस्थित राहतील. दरम्यान दुपारी 1.15 वाजता थडीपवनी येथील ग्रामविकास विभागाच्या
अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. लोहारी सावंगा येथून रात्री 7 वाजता त्यांचे नागपूर येथे आगमन होईल. रात्री ते पुणेकडे
प्रयाण करतील.
*****
No comments:
Post a Comment