ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये
जावून घेतली भेट
नागपूर, दि. 6 : हिंगणघाट येथील जळीत
प्रकरणातील पीडितेच्या उपचारासाठी आवश्यक असणारे संपूर्ण सहाय्य देण्यात येत असून, उपचारामध्ये कुठलीही अडचण येणार
नाही. तसेच ‘मनोधैर्य’ योजनेतूनही संपूर्ण सहाय्य देण्यात येत
असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.
ऑरेंज सिटी हॉस्पिटल येथे आज महिला व बालविकास
मंत्री ठाकूर यांनी हिंगणघाट येथील पीडित तरुणीवरील उपचारासंदर्भांत माहिती घेतली.
उपचारामध्ये कुठलीही अडचण येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जात आहे. याबाबतचे आदेशच नागपूर आणि वर्धा येथील जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच आपण दोन्ही जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या संपर्कात असल्याचेही
यावेळी त्यांनी सांगितले.
समाजातील विकृती थांबविण्यासाठी मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे हे ठाम असून, अशा विकृतींना आळा बसावा यासाठी शासन कठोर भूमिका घेत आहे.
जलदगती न्यायालयात प्रकरणाची सुनावणी होणार असली तरी ती अधिक जलदगतीने करण्याबाबत
विचार करण्यात येईल. मुलींची छेड काढणे ही अतिशय गंभीर बाब असून, ती वेळीच थांबविली पाहिजे. त्यासाठी
शालेयस्तरावर मुला-मुलींना प्रशिक्षण देणे आणि विशेष उपाय योजण्याची गरज आहे.
समाजात बदनामी होईल, या भितीपोटी गप्प न बसता मुली आणि त्यांच्या पालकांनी ताबडतोब
पोलिसांना कळविले पाहिजे. पोलिसांनीही अशा तक्रारी प्राप्त झाल्यास तात्काळ
कार्यवाही करावी, असे सूचनाही त्यांनी केली.
*****
No comments:
Post a Comment