नागपूर, दि. 14 : उच्च
माध्यमिक व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा 18 फेब्रुवारी ते 23 मार्च 2020
दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. या परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या
विद्यार्थ्यांकरिता परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र, विषय बदल, प्रात्यक्षिक
परीक्षा व परीक्षेसंबंधी अन्य माहिती मिळण्याकरिता (गोपनीय माहिती वगळता) नागपूर
विभागीय मंडळाकडून हेल्पलाईन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या दोन्ही परीक्षेच्या
कालावधीत सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत ही हेल्पलाईन उपलब्ध राहील.
ही हेल्पलाईन उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस
प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता 18 फेब्रुवारी 2020 तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ठ
होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 3 मार्च 2020 पासून उपलब्ध होणार असून उच्च माध्यमिक
प्रमाणपत्र परीक्षेसाठी संपर्क अधिकारी म्हणून नागपूर विभागीय मंडळाचे वरिष्ठ
अधीक्षक बी. के. किन्नाके तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी संपर्क
अधिकारी म्हणून नागपूर विभागीय मंडळाचे वरिष्ठ अधीक्षक एन. बी. दुराणी यांची
नियुक्ती केली आहे.
या हेल्पलाईनचा उपयोग नागपूर विभागीय
मंडळाच्या कार्यकक्षेतील भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गडचिरोली व गोंदिया
जिल्ह्यातील विद्यार्थी व पालकांनी करावा. यासाठी 0712-2565403 च 2553401 या
क्रमांकाची दूरध्वनी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
या हेल्पलाईनचा उपयोग सर्व विद्यार्थी
व पालकांनी करावा, असे आवाहन विभागीय सचिव रविकांत देशपांडे यांनी केले आहे.
तसेच परीक्षेच्या कालावधीत
विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या, पालकांच्या तसेच पाल्यांच्या
परीक्षेविषयीच्या समस्या दूर व्हाव्यात व विद्यार्थ्यांना ताण- तणाव मुक्त
वातावरणात परीक्षा देता यावी यासाठी भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गडचिरोली व
गोंदिया या जिल्ह्याकरिता समुपदेशन व हेल्पलाईन सेवेसाठी समुपदेशकाचे भ्रमणध्वनी
क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.
नागपूर- विशाल गोस्वामी, शारदा महिला
विद्यालय, ओमनगर,नागपूर (8275039252), वर्धा- पी. के. शेकार, यशवंत विद्यालय,
सेलू, ता. सेलू (9766917338), भंडारा-
श्रीमती गायत्री भुसारी समर्थ विद्यालय, लाखनी (9011062355), गोंदिया-
मिलिंद रंगारी, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, गोंदिया
(9404860735), चंद्रपूर- सतीश पाटील, मातोश्री विद्यालय, तुकुम, चंद्रपूर
(9421914353), गडचिरोली- डी. एम. जवंजाळ, रेणुकाबाई उके हायस्कूल, शिवराजपूर, ता.
देसाईगंज (9421817089)
संबंधित जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी
तसेच पालकांनी त्यांच्या जिल्ह्यातील समुपदेशकाशी आपल्या समस्या निवारण करण्यासाठी
दिलेल्या भ्रमणीध्वनीवर संपर्क साधून आपल्या समस्यांचे समुपदेशन करावे, असे आवाहन
विभागीय सचिव रविकांत देशपांडे यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment