नागपूर,
दि. 23: राज्य शासनाने कोरोनाचा
प्रार्दुभाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू केला
आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्व शासकीय कार्यालयीन
खरेदी व विक्रीचे व्यवहार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणेला
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रवींद्र ठाकरे
यांनी अधिसूचनेद्वारे दिले आहेत.
प्रतिबंधात्मक
उपाय योजनांचा भाग म्हणून शासकीय कार्यालयाअंतर्गंत होणा-या खरेदी विक्री व इतर
व्यवहार ३१
मार्चपर्यंत
बंद ठेवण्यात आले आहेत. त्यासाठी आवश्यक खबरदारी व दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. ठाकरे यांनी दिले आहेत.
*****
No comments:
Post a Comment