Sunday, 1 March 2020

प्रादेशिक अंडी उबवण केंद्र येथे भूमीपूजन

 नागपूर दि. 01 : नागपूरच्या प्रादेशिक अंडी उबवण केंद्रात कुक्कुटपालनाची क्षमता वाढविण्यासाठी सेमिनरी हिल्स येथे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते इमारतीच्या बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले.
यावेळी माफसूचे कुलगुरु डॉ.  आशिष पातूरकर, प्रादेशिक सहआयुक्त डॉ. किशोर कुमरे, सहायक आयुक्त डॉ. मृणालिनी साखरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, जिल्हा उपायुक्त डॉ. मंजूषा पुंडलिक यांची उपस्थिती होती.
            प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रात नव्या इमारतीमध्ये बुडर हाऊस, ग्रोवर हाऊस आणि ब्रीडर हाऊससाठी 6 कोटी 38 लाख रुपये खर्च येणार असून,  प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामध्ये भविष्यात पक्ष्यांची मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्याच्या दृष्टीने काम सुरु करण्याच्या सूचना श्री. केदार यांनी दिल्या. तसेच माफसूअंतर्गंत ग्रामीण भागातील शेतकरी, युवकांना गोटफार्मचे प्रशिक्षण देण्याबाबत श्री. सुनील केदार यांनी आढावा घेतला.
            कुक्कुटपालन वाढविण्यासाठी आणि अधिक सक्षमपणे चालवण्यासाठी हैदराबाद येथे प्रशिक्षणासाठी एक चमूही पाठविण्यात आली होती.  
                                                                         ****

No comments:

Post a Comment