Tuesday, 21 April 2020

सम-विषम सांकेतांकानुसार चालणार कोषागाराचे काम



नागपूर, दि. 21 : कोरोना प्रादुर्भावामुळे सुरक्षेच्या द्ष्टीने केंद्र व राज्य शासनाने गर्दी न करण्याबाबत तसेच सोशल डिस्टन्सिगचे पालन करावयाचे असल्यामुळे दिनांक 21 एप्रिल पासून कार्यालयीन कामाच्या दिवसानुसार आहरण व संवितरण अधिकारी यांचे सांकेतांकानुसार सम आणि विषम संख्येनुसार कोषागाराशी संबंधित कामे करण्यात येतील.
सुरक्षेच्या दृष्टीने सम आहरण व संवितरण सांकेतांक क्रमांची कामे ही दिनांक 21 एप्रिल 2020 पासून तर विषम आहरण व संवितरण सांकेतांक क्रमांची कामे दिनांक 22 एप्रिल 2020 पासून एक दिवसाआड करण्यात येतील. सम आणि विषम दिवसांच्या कालावधीत जर एखाद्या कार्यालयाला तात्काळ देयक सादर करावयाचे असल्यास त्यांनी वरिष्ठ कोषागार अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, तरी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी सहकार्य करावे असे कोषागार अधिकारी यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
*****

No comments:

Post a Comment