Tuesday, 21 April 2020

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार देतील कोव्हिड-१९ संदर्भांतील प्रश्नांना उत्तरे

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बुधवारी साधणार संवाद

नागपूर, ता. २१ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर विभागात सुरू असलेल्या उपाययोजना आणि घेण्यात येत असलेली खबरदारी यासंदर्भात नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बुधवारी (ता. २२) दुपारी ४ वाजता नागरिकांशी संवाद साधतील. 
संवादानंतर याच विषयाच्या  अनुषंगाने नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तरे देतील. 

विभागीय आयुक्तांशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधण्यासाठी  @metrorailnagpur, @DIRNagpur या पेजवरून तसेच Divisional Commissioner Nagpur या फेसबुक अकाउंटशी कनेक्ट होता येईल. 
नागरिकांनी कनेक्ट होऊन आपल्या शंकांचे निरसन करावे, असे आवाहन संचालक, माहिती व जनसंपर्क हेमराज बागुल यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment