नागपूर, दि.3 : ‘लॉकडाऊन’मुळे संकटात सापडलेले असंघटीत कामगार व गरजू
व्यक्तींना मदत म्हणून ‘वनराई’तर्फे एक
लाखाचा धनादेश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांना सुपुर्द करण्यात आला. आमदार राजू पारवे, जिल्हाधिकारी
रविंद्र ठाकरे, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, अजय पाटील यावेळी उपस्थित होते.
आयटीसी
कंपनीने गरिब व गरजू व्यक्तींना देण्यासाठी जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. यात
दोन टन आटा, एक टन बिस्कीटे, तीन हजार सातशे किलो नुडल्स व पाचशे किलो चीप्स या सामुग्रीचा समावेश आहे.
******
No comments:
Post a Comment