· बिहार, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंडसाठी श्रमिक रेल्वे
नागपूर, दि.21 : बिहार, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड आदी राज्यांसाठी प्रशासनातर्फे विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येणार आहेत. विशेष रेल्वेने प्रवास करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षासोबत संपर्क साधून आपली नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.
प्रशासनातर्फे विशेष श्रमिक रेल्वे सोडण्याचे नियोजन करण्यात आले असून यासाठी विभागात अडकलेल्या नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष नागपूर-0712-256268, भंडारा-07184-251222, गडचिरोली-07132-222031, गोंदिया-07182-230196, वर्धा-07152-243446 व चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक 07172-272480 यावर आपली संपूर्ण माहिती देण्यात यावी. यामध्ये दूरध्वनी क्रमांक (मोबाईल क्रमांक) आवश्यक आहे. आपल्या जाण्याच्या प्रवासानुसार संबंधित श्रमिक रेल्वेसंबंधी संपूर्ण माहिती आपणास मोबाईलवर अथवा दूरध्वनीवर कळविण्यात येईल. यामध्ये रेल्वेची जाण्याची दिनांक, वेळ आदी संपूर्ण माहिती कळविण्यात येईल.
तरी श्रमिक रेल्वेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा व आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment