* गुणांची सरासरी काढून होणार गुणदान
* दहावीच्या भूगोल व कार्यशिक्षण
विषयाबाबत निर्णय
नागपूर, दि. 28 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळामार्फत 3 ते 23 मार्च 2020
दरम्यान इयत्ता दहावीची शालान्त प्रमाणपत्र परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र,
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात आला. त्यामुळे दिनांक 23 मार्च 2020 रोजी आयोजित इयत्ता दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द
करण्यात आला. त्याचप्रमाणे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण या विषयांच्या
परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.
या रद्द झालेल्या विषयांचे गुणदान सरासरी
गुणांच्या आधारे करण्यात येतील.
सामाजिक शास्त्रे पेपर-2 (भूगोल) या
विषयाचे गुणदान हे उमेदवाराने दिलेल्या अन्य विषयांच्या लेखी परीक्षेस प्राप्त
केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेवून त्याचे रुपांतर परीक्षा रद्द केलेल्या
भूगोल विषयाच्या परीक्षेसाठी निर्धांरित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येईल.
तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या
कार्यशिक्षण या विषयाचे गुणदान त्याने अन्य विषयांच्या लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक,
अंतर्गत मूल्यमापन, तत्सम परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी विचारत घेवून
त्याचे रुपांतर परीक्षा रद्द केलेल्या कार्यशिक्षण विषयाच्या परीक्षेसाठी
निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येईल.
यानुसार भूगोल व कार्यशिक्षण या
विषयांच्या परीक्षेसाठी गुणदान करुन निकाल जाहीर करण्यात येईल, असे राज्यमंडळाचे
सचिव डॉ. अशोक भोसले यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.
****
No comments:
Post a Comment