नागपूर, दि. 29 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 1 जुलै रोजी कृषी दिन साजरा करण्यात येतो. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे आता ग्रामस्तरावर दिनांक 1 ते 7 जुलै 2020 दरम्यान संजिवनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी यावर्षी ‘पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांची उत्पन्न वाढ’ या त्रिसुत्रीचा अवलंब कृषी विभाग शासनाच्या निर्देशनुसार करणार आहे. या सप्ताहात खरीप हंगाम 2020 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषद, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, आत्मा, कृषी व कृषी संलग्न विभाग यांच्या सहकार्याने कृषी संदर्भातील माहिती या सप्ताहात शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात आयोजित करण्यात येत असलेल्या कृषी संजीवनी सप्ताह कार्यक्रमात सहभागी होवून कृषी ज्ञानाच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment