नागपूर, दि. 9 :
भारतीय हातमाग तंत्रविज्ञान संस्थेतील सन
2020-21 या शैक्षणिक सत्रासाठी हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविकेच्या
तीन वर्षीय अभ्यासक्रम प्रथम सत्रासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. प्रथम सत्रासाठी प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या
उमेदवारांनी आपले अर्ज 17 जुलै 2020 पर्यंत वस्त्रोद्योग आयुक्तालयाच्या वेबसाईटवर सादर
करावे, असे आवाहन प्रादेशिक उपआयुक्त स.
ल. भोसले यांनी केले आहे.
महाराष्ट्रातून बरगढ (ओडीशा) येथील 13
व वेंकटगिरी येथील 2 जागेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवारांनी प्रादेशिक उप आयुक्त,
वस्त्रोद्योग, नागपूर यांच्यामार्फत विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा. प्रवेश
अर्जाचा नमुना व इतर अनुषंगिक माहिती वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे वेबसाईट http.www.dirtexmah.gov.in वर उपलब्ध
आहे. तसेच अर्जाचा नमुना विदर्भातील सर्व प्रादेशिक उपआयुक्त , वस्त्रोद्योग
यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध आहे.
पात्र
विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा नमुना व इतर माहिती प्रादेशिक उपआयुक्त , वस्त्रोद्योग, प्रशासकीय
इमारत क्रमांक- 2, 8 वा माळा, बी विंग, सिव्हिल लाईन्स, नागपूर 440001, दूरध्वनी
क्रमांक 0712-2537927 यांच्या कडून प्राप्त करून घ्यावी. तसेच अर्जाचा नमुना, विहित
पात्रता व माहिती कार्यालयाच्या नोटीस
बोर्डवर लावण्यात आली आहे, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे कळविण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment