Wednesday, 3 June 2020

खरीपासाठी बियाणे व खताचा मागणीनुसार पुरवठा करणार - कृषी मंत्री दादाजी भुसे


                                               



·        'शेतक-यांच्या बांधावर खत-बियाणेयोजनेचा शुभारंभ       



        नागपूरदि. 3 : राज्यातील सर्व शेतक-यांना लागणारे रासायनिक खते व  बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध असून खते व बियाण्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी  तात्काळ सोडविण्याचे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी कृषी विभागाला  दिलेत. 
            सावनेर तालुक्यातील खुबाळा येथे 'शेतक-यांच्या बांधावर खते व बियाणे योजने'च्या शुभारंभ झाला यावेही कृषी मार्गदर्शन प्रचार रथाला हिरवी झेंडी दाखवून  प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी  आयोजि कार्यक्रमात ते बोलत होते.
            जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारेखुबाळ्याचे सरपंच यादवराव ठाकरेकृषी सभापती तापेश्वर वैद्यसावनेर पंचायत समिती सभापती अरुणा शिंदेजिल्हा परिषद सदस्या छायाताई बनसिंगेज्योती शिरस्करपंचायत समिती सदस्य अरुणा चिकलेउपसरपंच दिलीप खुबाळकरविभागीय कृषी सहसंचालक डॉ. रवींद्र भोसलेजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलींद शेंडे, उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रेतहसीलदार दीपक कारंडेतालुका कृषी अधिकारी अरुण कुसाळकर, तालुका कृषी अधिकारी अश्विनी कोरे, गटविकास अधिकारी अनिल नागणे यांची उपस्थिती होती.
            खुबाळा येथील पन्नास शेतकऱ्यांना तूर बियाण्यांची 100 पाकिटे व टप्प्याटप्प्याने 3 टन रासायनिक खतांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे खते-बियाण्याबाबत तक्रार असल्यास शेतक-यांनी संबंधित कृषी अधिका-याशी संपर्क साधावा. राज्य शासनाने कृषीमालास लॉकडाऊनमधून वगळल्यानंतरही कोरोनामुळे शेतक-यांनी पिकविलेला माल ग्राहकांपर्यंत वेळेत पोहचू शकला नाही. कृषीमाल उत्पादकांना मोठा फटका बसला असल्यामुळे शेतक-यांनी कृषीमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांकडे वळावेअसे आवाहन श्री. भुसे यांनी केले.
            नागपूर विभागातील पीककर्जप्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना मिळणारी मदत, खते-बी बियाणेराज्य शासनाकडे असलेला साठा आणि शेतक-यांची प्रत्यक्ष मागणी आदीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतलातसेच शिखर बँक आणि संलग्नीत बँकांकडून शेतक-यांना लवकरात लवकर पीककर्ज उपलब्ध देण्याचे संबंधित विभागांना आदेश दिले असल्याचे श्री.  भुसे यांनी सांगितले
                                 टोळधाडीच्या नुकसानीचे पंचनामे करा


            विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा जिल्ह्यात टोळधाडीमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यावर कीटकनाशकाची फवारणी करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करण्याचे निर्देश कृषी आणि महसूल विभागाला दिले असल्याचे कृषी मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले. शेतक-यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत नवनवे प्रयोग करत आधुनिक शेती करावी. सोबतच कृषीपूरक व्यवसाय, कृषीमालावर प्रक्रिया करणारे उद्योगही गटसमूहातून सुरु करण्याचे शेतक-यांना आवाहन केले. राज्य शासन शेतक-यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे असून, शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनावर भर देण्यास त्यांनी  सांगितले.
 गावकऱ्यांची आस्थेवाईक विचारपूस ; खबरदारी घेण्याच्या सूचना

            कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांची आस्थेवाईक विचारपूस केली. कोरोना बाबत योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करुन सँनिटाय, मास्क, सतत हात धुण्याच्या आयसीएमआर ने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन केले. एकमेकांशी संवाद साधताना सुरक्षित वावराच्या नियमाचे कटाक्षाने पालन करण्याच्या सूचनाही  श्री. भुसे यांनी खुबाळवासीयांना केल्या.
            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहाय्यक रोशन डंभारे यांनी तर आभार तालुका कृषी अधिकारी अश्विनी कोरे यांनी मानले.
****


No comments:

Post a Comment