नागपूर, दि. 5 : सुप्रसिद्ध कृषी तज्ज्ञ मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी
कुलगुरु व साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटरचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी यांनी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पोलिस विभागाने केलेल्या अत्युकृष्ट
सेवेबद्दल पोलिस कल्याण निधीसाठी 75 हजार रुपयांचा धनादेश गृहमंत्री अनिल देशमुख
यांना आज दिला.
कोरोनाच्या संदर्भात लागू करण्यात
आलेल्या ‘लॉकडाऊन’च्या काळात पोलिस यंत्रणेने अत्यंत चोख बंदोबस्त ठेवून अहोरात्र
सेवा बजावली. कोरोना योद्ध्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डॉ. सी. डी. मायी
यांनी केंद्रशासनाच्या मिळणाऱ्या दोन महिन्यांची पेन्शन रुपये 75 हजार पोलिस
कल्याण निधीला दिली आहे. यावेळी पोलिस आयुक्त डॉ. भूषण कुमार उपाध्याय यांनी
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते कृतज्ञता निधी स्वीकारला.
डॉ. सी. डी. मायी हे जगप्रसिद्ध कापूस
शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. श्री. मायी ॲग्रिकल्चर फायनान्स कार्पोरेशन ऑफ
इंडियाचे अध्यक्ष असून भारत सरकारच्या कृषी मंत्रालयात कृषी आयुक्त, कॉटन रिसर्च सेंटरचे डायरेक्टर, ॲग्रिकल्चर
सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्डाचे अध्यक्ष, आयएसएएए व एबीएनई या आंतरराष्ट्रीय संस्थेवर
सुद्धा डॉ. मायी यांनी काम केले आहे.
*******
No comments:
Post a Comment