नागपूर, दि. 1 : महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी
करणाऱ्या महिलांना व संस्थांना दरवर्षी महिला
व बाल विकास विभागातर्फे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’
पुरस्काराने गौरविण्यात येते.
सन 2018-19 व 2019-20 या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक महिला, संस्थाकडून
राज्यस्तरीय, विभागीय तसेच जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी
प्रस्ताव मागविण्यात येत आहे. यामध्ये इच्छुक व्यक्ती,
संस्था यांनी आपले प्रस्ताव दोन प्रतीत आवश्यक त्या कागदपत्रासह दिनांक 20 जुलै
2020 पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नवीन
प्रशासकीय इमारत क्रमांक-2,
सिव्हिल लाईन्स, नागपूर
कार्यालयास सादर करावे,
असे आवाहन जिल्हा महिला
व बाल विकास अधिकारी अपर्णा कोल्हे यांनी केले आहे.
पुरस्काराचे स्वरुप
राज्यस्तरीय पुरस्कार:- 1,00,001 रोख रुपये,
स्मृती चिन्ह, सन्मानपत्र,
शाल व श्रीफळ असे राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरुप आहे. महिला व बाल विकास
क्षेत्रात किमान 25 वर्षांचा
सामाजिक कार्याचा अनुभव असावा.
ज्या महिलांना
जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, दलित मित्र पुरस्कार अथवा
सावित्राबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे त्या महिला तो पुरस्कार मिळाल्याच्या 5 वर्षांपर्यंत
राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
विभागीय पुरस्कार:- 25,001 रोख रुपये,
स्मृती चिन्ह, सन्मानपत्र, शाल
व श्रीफळ असे राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरुप आहे. महिला व बाल विकास
क्षेत्रात किमान 10 वर्षे कार्याचा अनुभव असावा. नोंदणीकृत संस्थेस दलित
मित्र पुरस्कार प्राप्त नसावा.
ती महिला अथवा संस्था
राजकारणापासून अलिप्त असावी.
जिल्हास्तरीय पुरस्कार:- 10,001 रोख रुपये,
स्मृती चिन्ह, सन्मानपत्र, शाल
व श्रीफळ असे राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरुप आहे. महिला व बाल विकास
क्षेत्रात किमान 10 वर्षे सामाजिक कार्याचा अनुभव असावा. ज्या
महिलांना दलित मित्र पुरस्कार किंवा सावित्राबाई फुले पुरस्कार प्राप्त झाला आहे, त्या
महिला या पुरस्कारासाठी पात्र राहणार
नाहीत.
राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव धारकाची
माहिती, केलेल्या कार्याचा तपशील, फोटो,
वृत्तपत्रीय कात्रणे, सध्या कार्यरत असलेले पद, यापूर्वी
पुरस्कार मिळाला असल्यास त्याचा तपशील, पोलिस विभागाचे चारित्र
पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे. विभागस्तर
पुरस्कारासाठी संस्थेची माहिती,
वृत्तपत्रीय कात्रणे, संस्थेस
यापूर्वी पुरस्कार मिळाला असल्यास त्याचा तपशील, संस्थेच्या कार्याचा
अहवाल, संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, घटनेची
प्रत, गुन्हा दाखल नसल्याचे पोलिस विभागाचे प्रमाणपत्र
सादर करावे. मुदतीनंतर येणाऱ्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी 0712-2569991 यावर संपर्क साधावा. ******
No comments:
Post a Comment