नागपूर, दि. 1 : व्यवसायकर कायद्यार्गत जुनी प्रलंबित असणारी
विवरणपत्रे 31 जुलै 2020 पर्यंत
दाखल केल्यास कोणत्याही प्रकारचे विलंब शुल्क आकारण्यात येणार नाही.
तरी व्यवसाय करदात्यांनी तसेच संबंधित
सर्व आस्थापना, उद्योजक, व्यापारी आणि कर
सल्लागार यांनी सर्व प्रलंबित विवरण पत्रे 31 जुलैच्या
आत दाखल करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यवसायकर अधिकारी प्रमोद पिंगे यांनी केले आहे.
व्यवसाय कर विवरणपत्रे
दाखल करण्याकरिता विलंब शुल्क माफ अधिसूचना
शासनाच्या www.mahast.gst.in या संकेस्थळावर उपलब्ध
आहे. काही अडचणी आल्यास संबंधित
व्यवसाय कर कार्यालयाशी संपर्क
साधावा, अशी सूचना करण्यात आली आहे.
******
No comments:
Post a Comment