नागपूर, दि. 1: कोविड-19 या
संसर्गजन्य रोगावर प्रतिबंधात्मक कार्यवाही अंतर्गत संपूर्ण देशात लॉकडाऊनमुळे
स्थलांतीरत मजूर परराज्यात अडकून पडलेले असल्यामुळे त्यांना मुळ निवासाच्या ठिकाणी
जाण्याकरीता शासनाने काही अटींच्या अधिन राहून त्यांची वाहतुक करण्यास परवानगी
दिलेली होती.
भारतातील
इतर राज्यांमध्ये अडकून पडलेल्या स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या स्वत:च्या वाहनाने
किंवा शासनाच्या वाहनाने परत आणण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या.
त्यासाठी इतर जिल्ह्यात किंवा परराज्यात कोविड-19 मुळे वाहतुक प्रतिबंधात्मक
कार्यवाहीमुळे अडकून पडलेल्या नागपूर जिल्ह्यातील रहीवाश्यांनी तसेच स्थलांतरीत
मजूरांनी त्यांचे निवासस्थानी परत येण्याकरीता किंवा परत आल्याबाबतची माहिती http#//rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावर रोजगारासाठी नोंदणी करावी.
असे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,
नागपूर यांचे मार्फत करण्यात आले आहे.
मजूरांनी
तसेच जिल्ह्यातील रहीवासी यांचे मार्फत करण्यात आलेल्या नोंदणीबाबत सविस्तर माहिती
मिळण्यासाठी सहाय्यक आयुक्त, कामगार नागपूर यांचेकडे संपर्क साधावा, वरील सर्व
माहिती Nagpur.gov.in
या संकेत स्थळावर उपलब्ध असलेल्या लिंकवर
भरावयाची आहे. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरणचे रविंद्र ठाकरे यांनी कळविले आहे.
*****
No comments:
Post a Comment