Monday, 3 August 2020

शेतक-यांना आता गाव नमुना आठ अ मिळणार ऑनलाईन - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात



        नागपूर,  दि. 3 :  शेतकऱ्यांना सातबाऱ्यासोबतच गाव नमुना आठ अ आता ऑनलाईन मिळणार असन महस दिनापासनच या कामाची अंमलबजावणी सुर झाल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज सांगितले.
            कोविडबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर आज महस मंत्रयांच्या हस्ते बचतभवन येथे प्रातिनिधीक स्वरपात चेतन निघोट, मधुकर उमरेडकर, प्रशांत चिखले, पुरषोत्तम फटींग, अनिल सेलकर, गंगाधर गभणे, गजानन ठाकरे, नामदेव मोर, अन्नपुर्णाबाई तळजकार, हेमराज मोरे, महादेव ठाकरे या शेतकऱ्यांना गावनमुना आठ अ  वितरीत करण्यात आले. तसेच शहीद जवान रत्नाकर कळबे यांच्या पत्नी डॉ. अर्चना कळबे व शहीद तेजराव दंदी यांच्य पत्नी इंदुमती दंदी यांना दोन हेक्टर जमीन प्रदान करण्याबाबतचे प्रमाणपत्र ही  श्री. थोरात यांच्या हस्ते देण्यात आले.
            महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत 18 हजार कोटी एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केली असून शासनाने  गेल्या दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी केली असल्याचे महसूल मंत्र्यांनी सांगितले. कोविड संकटाच्या काळात स्थलांतरित नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करुन देणारे महाराष्ट्र हे एकमेव  राज्य असल्याचे श्री. थोरात यांनी सांगितले.
****

No comments:

Post a Comment