Monday, 3 August 2020

शासकीय तथा खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश सुरु

                    
        नागपूर, दि. 3: व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाअंतर्गत सर्व शासकीय तथा खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून प्रवेशास इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी तयार केलेल्या admission.dvet.gov.in या ॲडमिशन पोर्टलव्दारे अथवा mahaITI या ॲड्रॉइड मोबाइल ॲपद्वारे सर्व प्रवेशासंबंधी माहिती घेऊनच प्रवेश अर्ज सादर करावा. 
            आयटीआयचे प्रवेश ॲडमिशन पोर्टल admission.dvet.gov.in अथवा mahaITI ॲड्रॉइड मोबाइल ॲप मार्फतच होतील तसेच त्यावर नोंद असलेल्या संस्थामध्येच प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावेत.      नवी दिल्लीच्या DGET ची संलग्नता प्राप्त असल्याची खात्री करुनच त्या व्यवसाय किंवा  तुकडीस प्रवेश घेण्याचे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नागपूरचे सहसंचालक पी. टी. देवतळे यांनी केले आहे.
***** 

No comments:

Post a Comment