नागपूर, दि. 15: भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. त्यानंतर त्यांनी सशस्त्र पोलिस दलाची मानवंदना स्विकारली.
भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी यांनी स्वातंत्र्य सेनानी, ज्येष्ठ नागरिक
तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना भेटून शुभेच्छा दिल्या.
अतिरिक्त
जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी,
उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे, सुजाता गंधे, आशिष बिजवल, रविंद्र कुंभारे, विजया
बनकर, शिवनंदा लंगडापुरे, पोलिस उपअधीक्षक संजय पुरंदरे, पोलिस निरिक्षक विकास
तिडके, पोलिस उपनिरिक्षक मधुकर प्रधान, जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे तसेच
वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
*****
No comments:
Post a Comment