Monday, 26 October 2020

 खासगी वैद्यकीय आस्थापनांनी लसीकरणासाठी माहिती द्यावी

                              -जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे

 

        नागपूर दि.26 : जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटल व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत संस्थांनी  लसीकरणाची  नोंदणी करण्यासाठी  पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे  यांनी केले आहे. कोरोनाच्या नायनाटासाठी आरोग्यदुतांची सुदृढता महत्त्वाची आहे.  कदाचित कोरोनाची दुसरी लाट आल्यास त्याचा आरोग्य दुतांना प्रादुर्भाव होवू नये म्हणून खासगी आस्थापनांनी पुढाकार घेवून त्यांच्याकडील कार्यरत आरोग्य सेवक कर्मचाऱ्यांची माहिती द्यावी.

            कोरोना लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राथमिकता देण्यात येणार आहे. जिल्ह्यात यासंदर्भात आरोग्य यंत्रणांना याअनुषंगाने माहिती गोळा करणे सुरु आहे.  

            लसीकरण मोहिमेसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक हे राष्ट्रीय स्तरावर नोडल अधिकारी असतील. यासाठी लवकरच जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नावाची नोंद करण्याचे काम सुरू आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाने कालमर्यादेत सर्व माहिती संगणकावर अपलोड करण्याचे निर्देशित केले आहे.

            सेवा देणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचारी यांची माहितीशासकीयनिमशासकीय खासगी आरोग्य संस्थावैद्यकीय व्यावसायिकअशा गटातून मागितली जाणार आहे. जिल्ह्यापासून तालुक्यापर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांची  माहिती गोळा केली जाणार आहे.

***

No comments:

Post a Comment