मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमत्तिक रजा
नागपूर, दि.11 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असून सदर मतदान 1 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणूकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदानाच्या दिवसाची विशेष नैमत्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे. ही रजा कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय असलेल्या नैमत्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे.
No comments:
Post a Comment