महा आवास
अभियानांतर्गत प्रलंबित
घर बांधणीला गती द्यावी
-विभागीय आयुक्त डॉ.
संजीव कुमार
नागपूर, दि. 26: ग्रामीण भागातील प्रधानमंत्री आवास योजनेसह रमाई, शबरी, पारधी, आदिम, अटल कामगार आवास योजना या सर्व योजनेतील प्रलंबित व अपूर्ण असलेल्या घरबांधणीला महा आवास अभियानास गती देण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित ऑनलाईन कार्यशाळेत दिले.
यावेळी आदिवासी
विकास विभागाचे उपायुक्त दीपक हेडाऊ, उपायुक्त विकास शाखा अंकुश केदार, सहाय्यक विकास शाखा सुनील निकम,
प्रादेशिक उपायुक्त
समाज कल्याण डॉ. सिद्धार्थ
गायकवाड, सहाय्यक
आयुक्त कामगार विभाग राजदीप धुर्वे
उपस्थित होते.
या
ऑनलाईन कार्यशाळेत विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी यासह अंमलबजावणी करणाऱ्या
यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. महा आवास अभियानांतर्गत “ सर्वांसाठी
घरे ” या धोरणांतर्गत अभियान राबवून सर्व ग्रामीण
गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये पंचायत राज
संस्था, स्वयंसेवी संस्था, सहकारी, खाजगी
संस्था, बँका, लोकप्रतिनिधी, लाभार्थी, ग्रामस्थांचा
सक्रिय सहभाग असणार आहे. ग्रामीण भागातील घरांचा
दर्जा व गुणवत्ता वाढविण्यावर भर असणार आहे.
महा आवास
अभियान 20 नोव्हेंबर 2020 ते 28 फेब्रुवारी
2021 या शंभर दिवसांच्या कालावधीत राबविण्यात येईल.
या अभियानात भूमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देणे. घरकुलांच्या उद्दिष्टांप्रमाणे मंजुरी देणे, मंजूर
घरकुलांना हप्त्यांचे वितरण करणे तसेच घरकुल भौतिकदृष्ट्या पूर्ण करणे व प्रलंबित घरकुलांच्या कामांना गती देण्याचे नियोजन
आहे. यासाठी ग्रामीण गवंडी प्रशिक्षण तसेच पंचायत समिती निहाय्य डेमो
हाऊसेस उभारणे
या अभियानात फक्त घर न
बांधून देता लाभार्थ्यांला त्या व्यतिरिक्त स्वच्छ भारत मिशन मधून शौचालय, जल
जीवन मिशन मधून पिण्याचे पाणी,
उज्ज्वला योजनेतून गॅस
जोडणी व सौभाग्य योजनेतून विद्युत जोडणी तसेच जीवनोन्नती उपजीविकेचे साधन देण्यात येईल.
या
अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकताच 20 नोव्हेंबर
रोजी सह्याद्री अतिथीगृहावर पार पडला. ग्रामीण बेघरांसाठी
महा आवास अभियान महत्त्वपूर्ण
ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. राज्यात सुमारे 8.82 लक्ष घरकुलांची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठीच विभागस्तरीय
कार्यशाळा आज घेण्यात आली. त्यानंतर जिल्हास्तरीय व ग्रामस्तरीय कार्यशाळा देखील घेण्यात
येणार आहे. या योजनेचा नागरिकांमध्ये प्रचार, प्रसार
व जाणीव जागृती होऊन अभियानाचा हेतू साध्य
करण्याचे विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देशित केले.
अभियानासाठी
जिल्हा पातळीवर पाठपुरावा करुन तसेच वेळोवेळी आढावा घेवून अभियानात येणाऱ्या अडचणींना
सोडविण्याचे निर्देशही त्यांनी दिले. अपूर्ण घरांच्या बांधकामावर लक्ष केंद्रीत
करुन ती पूर्णत्वास नेण्याला प्राधान्य देण्याचेही विभागीय आयुक्तांनी सांगितले.
00000
No comments:
Post a Comment