नागपूर, दि.29 -लोकशाही बळकट व समृध्द करण्यासाठी येत्या 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या
पदवीधर निवडणुकीत नोंदणी केलेल्या पदवीधर
मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तसेच विभागीय आयुक्त
डॉ.संजीवकुमार यांनी आज केले.
कोविड
सुरक्षा मानकांनुसार पदवीधर निवडणूक घेण्यात येणार आहे.मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगचा वापर
करून निवडणुकीचा हक्क अधिक सुरक्षीतपणे मतदारांना बजावता येणार आहे.
येणा-या 1 डिसेंबर रोजी पदवीधर
निवडणुकीसाठी मतदान होईल, त्यासाठी योग्य व्यवस्थापन व तयारीसह प्रशासन
सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार
यांनी आज दिली.
3 नोव्हेंबर रोजी पदवीधर निवडणूक कार्यक्रम जाहिर
झाला होता.आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार व छाननीनंतर नागपूर विभागीय पदवीधर
मतदारसंघाच्या निवडणुकीत 19 उमेदवार रिंगणात आहेत.
विभागात
साधारण दोन लक्ष मतदार असून त्यापैकी 1 लक्ष 10 हजार मतदार हे एकटया नागपूर जिल्हयातील
आहेत.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानाच्या आधी 48 तास आधी म्हणजे आज सायंकाळी 5 वाजता प्रचार थांबणार आहे. निवडणुकीत 100 टक्के मतदान करण्याचे
आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment