नागपूर
पदवीधर मतदारसंघात 53.64
मतदान
नागपूर, दि. 1 : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघात आज सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी 4 वाजेपर्यंत 53.64 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
सकाळच्या पहिल्या एक तासात येथील मतदान केंद्र
क्रमांक 38 मध्ये एकूण मतदार 594 असून, त्यापैकी 50 तर मतदान केंद्र क्रमांक 39 मध्ये 583
पैकी 30 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
तसेच
कामठी तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर अंजली
रंगारी या महिला मतदाराचा दोन दिवसांपूर्वी अपघात झाला असतानाही त्यांनी मतदानाचा
हक्क बजावला.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 कामठी तहसील कार्यालयातील मतदान केंद्र क्रमांक
20 येथे मतदारांचे तापमान, हँड सँनिटाईज, तसेच
ऑक्सिमीटरने ऑक्सिजनचे प्रमाणही तपासण्यात येत होते, येथे मतदाराच्या आरोग्य
सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले. तसेच कोविड- 19 चे संपूर्ण
किट उपलब्ध करून देण्यात येत असून, मतदान
प्रक्रियेमध्ये सहभागी कर्मचा-यांनी पीपीई कीट परिधान करत काळजी घेतली.
कन्हान पिपरी नगर परिषद येथील मतदान केंद्र क्रमांक 22 मध्ये एकूण 456
मतदारांपैकी 50
मतदारांनी मतदानाचा
हक्क बजावला. येथे सकाळी 10
वाजेपर्यंत 11 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक विभागाने
सांगितले.
पारशिवनी तहसील कार्यालय मतदान केंद्र क्रमांक
जी 8 येथे सकाळी 10 वाजेपर्यंत 279
पैकी 79 मतदारांनी मतदान केले.
सावनेर येथील नगर परिषद सुभाष प्राथमिक शाळा
मतदान केंद्र क्रमांक 10
येथे दुपारी 12 वाजेपर्यंत 501 पैकी 211
मतदारांनी मतदान केले तर केंद्र क्रमांक 11 येथे 304
पैकी 108 जणांनी मतदान केले. पारशिवनी तहसील कार्यालय मतदान केंद्र क्रमांक
जी 8 येथे सकाळी 10 वाजेपर्यंत 279
पैकी 79 मतदारांनी मतदान केले.
****
No comments:
Post a Comment