कोराना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेतंर्गत रामटेक येथील यात्रा रद्द
Ø जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारली झाकीची परवानगी
नागपूर, दि.26 : रामटेक येथील भारतीय जनसेवा मंडळ यांनी रामटेक
शहरात वैकुंठ चर्तुदशी निमित्त 28 नोव्हेंबर रोजी
होणाऱ्या प्रतिकात्मक 5 झाकी करीता परवानगी देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
दिले होते. परंतु कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव व दुसऱ्या टप्प्यातील कोरोना
विषाणूच्या प्रसारात झपाटयाने वाढ होत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण
होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच साथरोग प्रतिबंधात्मक
कायदा 1897 व त्याखालील नियमावली मधील नियम 2 व 10 नुसार श्रीराम गडमंदीर रामटेक
येथे होणाऱ्या कार्यक्रमास जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण
नागपूरचे अध्यक्ष रवींद्र ठाकरे यांनी एका आदेशाद्वारे शोभायात्रेला परवानगी
नाकारली आहे.
रामटेक
शहरात वैकुंठ चतुर्दशी निमित्त 1980 पासून सामाजिक बंधुत्व व राष्ट्र निर्माण,
सदभाव निर्माण करण्याच्या दृष्टीने फक्त मनोरंजन
सांस्कृतिक झाकीचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी शोभायात्रेत 40 झाकी
संम्मेलित होत असतात. त्यामुळे या वर्षी कोरोना महामारीच्या संकटामुळे शासकीय नियमांचे
पालन करुन सार्वजनिक आरोग्याची काळजी घेत
मागील 39 वर्षापासून सांस्कृतिक, धार्मिक व सामाजिक तसेच सर्व जाती धर्मामध्ये
बंधुत्व व राष्ट्रप्रेम जागृत करण्याच्या उपक्रमास खंड पडु नये याकरीता 28 नोव्हेंबरला
प्रतिकात्मक 5 झाकीकरीता परवानगी मिळावी, यासाठी निवेदन देण्यात आले होते. वैकुंठ चर्तुदशी
निमित्ताने रामटेक येथे 40 ते 50 हजाराच्या संख्येने भाविकांची गर्दी होते. रामटेक
शहरात सुध्दा मोठया प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव झाला असून शासनातर्फे
वेळोवेळी तिव्र व सौम्य प्रकारची जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. कोरोना विषाणूच्या
दुसऱ्या टप्प्यातील प्रार्दुभाव वाढण्याची
शक्यता लक्षात घेता कोविड प्रतिबंधात्मक
उपाययोजनेंतर्गत आदेश निर्गमित करण्यात आले आहे.
तसेच कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुध्दा तसे आदेश निर्गमित केले आहे.
00000
No comments:
Post a Comment