मुक्त विद्यालयांतील
इयत्ता पाचवी, आठवीसाठी मंगळवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरु
नागपूर, दि.
26: महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता पाचवी व
आठवीमध्ये प्रवेश घेऊ इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया
मंगळवार, दिनांक 1 डिसेंबरपासून सुरु होत
आहे.
मंगळवार, दिनांक 1
ते गुरुवार, 31 डिसेंबर 2020 दरम्यान
विद्यार्थ्यांनी नावनोंदणी अर्ज ऑनलाईन भरावेत. तसेच बुधवार दिनांक 2
डिसेंबर 2020 ते शनिवार, दिनांक 2
जानेवारी 2021
दरम्यान विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज व कागदपत्रे, विहित शुल्कांसह
अर्जावरील नमूद संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावीत आणि शुक्रवार, दिनांक
8 जानेवारी 2021 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे
अर्ज, विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी
विभागीय मंडळाकडे जमा करावी. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन राज्य मुक्त विद्यालय मंडळाचे
सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment