राज्यअंतर्गत नागपूर जिल्ह्यामध्ये पीकस्पर्धांचे आयोजन
नागपूर, दि 7 : कृषि खात्याकडून नागपूर जिल्ह्यात रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पीक स्पर्धाचे निकष बदलण्यात आले आहे. तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य पिकांच्या जिल्हाअंतर्गत पीक स्पर्धेचे आधीचे नियम, वेळापत्रक आणि बक्षिस रक्कम देखील बदलण्यात आलेली आहे. चालू रब्बी हंगामापासून नव्या निकषाची अंमलबजावणी होईल. त्यासाठी 31 डिसेंबर, 2020 पर्यंत शेतकरी अर्ज करु शकतात .
ज्वारी, गहू, हरभरा, जवस, तीळ अशा 5 पिकासाठी रब्बी पिकस्पर्धा होईल. तालुका कृषी अधिकारी या स्पर्धाचे आयोजन करतील, यासाठी शेतकऱ्यांना किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड करावी लागेल. पीक स्पर्धेतील पिकाची निवड करताना पिकनिहाय तालुक्यातील क्षेत्र किमान 1000 हेक्टर असावे.
तालुका स्तरावर सर्वसाधारण गटासाठी 10 व आदीवासी गटात 5 कमीत कमी अर्ज येणे आवश्यक आहे. संबंधित गावात त्यासाठी पीक कापणी समिती नेमली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांची पिकनिहाय उत्पादकता तालुक्याच्या सर्वसाधारण उत्पादकतेपेक्षा 1.5 पट किवा त्यापेक्षा अधिक आहे अशा शेतकऱ्यांना पीकस्पर्धेतील पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येऊन त्यांच्यामधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक निवडण्यात येतील. त्यापेक्षा कमी उत्पादन असणारे शेतकरी सर्व पातळीवरील पीकस्पर्धा पुरस्करासाठी अपात्र समजण्यात येतील.
गावपातळीवर पीक कापणी समिती
• पीककापणी समितीत कोण असेल : पर्यवेक्षण अधिकारी (अध्यक्ष), कृषी सहाय्यक (सदस्य सचिव), लाभार्थी शेतकरी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रगतीशील शेतकरी, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक.
• राज्यस्तरावरील स्पर्धेचे निकाल कोण घोषित करेल : कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती.
•
तालुका, जिल्हा राज्य व विभागस्तरावरील बक्षिसांची रक्कम : बक्षिसे स्वरुप
अ.क्र. | स्पर्धा पातळी | सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षीस रुपये | ||
पहिले | दुसरे | तिसरे | ||
1 | तालुका पातळी | 5,000 | 3,000 | 2,000 |
2 | जिल्हा पातळी | 10,000 | 7,000 | 5,000 |
3 | विभाग पातळी | 25,000 | 20,000 | 15,000 |
4 | राज्य पातळी | 50,000 | 40,000 | 30,000 |
प्राथमिक माहिती
• अर्ज कुठे कराल : संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकाऱ्याकडे
• स्पर्धेची माहिती कोण सांगेल : कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, कृषी मंडळ अधिकारी आणि तालुका कृषि अधिकारी
• कोणती कागदपत्रे लागतात : 300 रुपये स्पर्धा प्रवेश शुल्क भरल्याचे चलन , सातबारा , आठ - अ , आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र
अशा आहेत अटी
• पीक किमान सलग दहा आर. क्षेत्रावर हवे
• स्पर्धेत कोणताही शेतकरी भाग घेऊ शकतो
• एकापेक्षा जास्त पिकांसाठी सहभाग शक्य
• स्पर्धेचे प्रवेश शुल्क प्रत्येक 300 रुपये
• पुरस्कारासाठी प्रथम, द्वितीय, तृतीय असे तीनच क्रमांक असतील
• तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर पीकस्पर्धा होईल.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पीक स्पर्धेत सहभागी होण्याकरिता आवाहन करण्यात येत आहे.
00000
No comments:
Post a Comment