Monday, 7 December 2020

 उत्कृष्ट कार्याबद्दल कोषागार अधिकारी प्रकाश आकरे यांचा गौरव

                       नागपूरदि. 7 : लेखा व कोषागार विभागाच्या वरिष्ठ कोषागार कार्यालयातर्फे कोरोना व लॉकडाऊनच्या काळातही सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना  वेळेवर पेन्शनसोबतच कोषागार कार्यालयातील अभ्यागतांसाठी केलेल्या व्यवस्थेबद्दल विभागातर्फे वरिष्ठ कोषागार अधिकारी प्रकाश आकरे यांचा गौरव करण्यात आला. तसेच सेवानिवृत्तीनिमित्त त्यांना निरोप देण्यात आला.

       वरिष्ठ कोषागार कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी वरिष्ठ अधिकारी  अरविंद गोडे, अपर कोषागार अधिकारी  प्रशांत गोसेवाडे यावेळी  उपस्थित होते.

       अपर कोषागार अधिकारी  यांनी  लेखा व कोषागार कार्यालयात ‍क्रीडा स्पर्धा, कोषागार दिन  यांच्या आयोजनासंदर्भात कोरोनाच्या कालावधीत विशेष व्यवस्था निर्माण करुन कोषागार कार्यालयातर्फे लॉकडाऊन काळातही सर्व शासकीय कार्यालयांना नियमित सेवा उपलब्ध करुन दिली. त्यासोबतच कार्यालयातही विविध उपक्रम राबविले.  प्रकाश आकरे हे नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून त्यांना अधिकारी व कर्मचाऱ्यांतर्फे निरोप देण्यात आला.

       कार्यक्रमाचे संचालन प्रशांत गोसेवाडे यांनी तर आभार श्रीमती भोयर यांनी मानले.

****


No comments:

Post a Comment