शिष्यवृत्ती प्रक्रियेस ऑनलाईन सुरुवात
नागपूर दि. 7: सामाजिक न्याय विभाग व विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग यांच्यामार्फत विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. महाडिबीटी संगणकीय प्रणाली 2020-21 या शैक्षणिक सत्रासाठी नवीन अर्ज व नूतनीकरणाचे अर्ज भरण्यास 3 डिसेंबरपासून ऑनलाईन सुरुवात झालेली आहे. 2019-20 या शैक्षणिक सत्रासाठी पुनश्च: अर्ज सादर करण्यासही 3 डिसेंबरपासून ऑनलाईन प्रक्रियेस सुरुवात झालेली आहे.
अधिक माहिती http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, योजनेचे निकष, अटी-शर्ती इत्यादी माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. सर्व आवश्यक कागदपत्राच्या पुर्तता करुन आपले अर्ज विहित मुदतीत नोंदणीकृत करण्यात यावे जेणेकरुन सर्व पात्र विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता येईल. अधिक माहितीसाठी जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, (समाज कल्याण) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment