सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन व विना मास्कबाबत दंडात्मक कारवाई
Ø 94 लाख 42 हजार 164 दंड वसूल
नागपूर दि. 7: कोरोना विषाणूच्या प्रसारात घट झाली असली तरी त्याचे अस्तित्व अद्याप कायम आहे. जनतेने याबाबत आवश्यक काळजी घेतील नाही तर कोरोना विषाणूच्या प्रसारात झपाटयाने वाढ होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. मास्क न वापरणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करण्याबाबत यासाठी प्रतीव्यक्ती 500 रुपयांचा दंड प्रशासनामार्फत आकारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्य अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. समाजात वावरतांना लोकांमध्ये शारिरिक अंतर पाळणे देखील तेवढेच गरजेचे आहे. याचे पालन न करणाऱ्या व्यक्तीविरुध्द जिल्हा प्रशासनाद्वारे कडक कारवाई करण्यात येत असून त्यांच्या कडून दंड वसूल करण्यात येत आहे. आतापर्यंत नागपूर जिल्हयातील ग्रामीण व नगर परिषद, नगर पंचायत भागातून मास्क न लावल्या व्यकतीकडून 74 लाख 73 हजार 990 तर सोशल डिस्टंन्सिगचे पालन न करणाऱ्या व्यकतीकडून 19 लाख 68 हजार 174 असे एकूण 94 लाख 42 हजार 164 येवढा दंड प्रशासनाद्वारे वसूल करण्यात आलेला आहे.
00000
No comments:
Post a Comment